Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»भादलीच्या तरुणाचा खून? पाटचारीजवळ आढळला मृतदेह
    क्राईम

    भादलीच्या तरुणाचा खून? पाटचारीजवळ आढळला मृतदेह

    SaimatBy SaimatAugust 10, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  

    नशिराबाद जवळ असलेल्या भादली गावातील एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ असलेल्या एका शेताच्या बांधावर आज सकाळी मिळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संशयास्पदरित्या मिळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात असून हा खूनच असल्याची दबक्या आवाजात परिसरात चर्चा सुरु असल्याचे समजते. ताज्या वृत्तानुसार मृत तरुणाचे नाव संकेत लिलाधर आढाळे मुळ रा.डोंगरकठोरा, ता. यावल ह.मु. भादली असे असून तो जळगाव येथील एका फायनान्स कंपनीत  कामाला असल्याचे समजते. या प्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा  नोंद करण्याचे काम सुरू होते.

    दरम्यान, आज सकाळी भादली गावाकडे जाणाऱ्या कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती शेतात कामाला जाणाऱ्या काही शेतकरी मजुरांनी नशिराबाद पोलीस स्थानकाला कळविली होती. मिळालेल्या माहितीवरुन नशिराबाद पोलीस स्थानकाचे सपोनि अनिल मोरे, एएसआय अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय बाळू पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी असलेल्या मृतक तरुणाबाबत माहिती गोळा करण्याचे काम लागलीच सुरु करण्यात आले. त्यानंतर सदर तरुण हा भादली येथील संकेत लिलाधर आढाळे (वय 28) असे असल्याचे समोर आले. मृत तरुणाच्या डोक्यावर गंभीर इजा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप कारण कळाले नसले तरी हा खून असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु असल्याचे समजते. दरम्यान, तरुणाचा खून झाल्याचा संशय असला तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच नेमके मृत्यूचे कारण काय? हे समोर येणार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते तर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026

    Jalgaon:एमआयडीसीत थकबाकीदारांविरुद्ध जोरदार कारवाई, दोन कंपन्यांना तातडीने सील

    March 14, 2026

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.