साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे स्टेशन जवळील सिंधी कॉलनीतील घरातून अज्ञात चोरट्याने विव्हो वाय १५ कंपनीचा २० हजार किमतीचा मोबाईल ३ रोजी रात्री ११ ते ११-३० वाजेच्या दरम्यान लांबविला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी साउंड सिस्टीम व्यावसायिक रिंकेश हरिराम पवानी (वय ३५) हे ३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पत्नी सोबत नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी घरी मुलगा व मुलगी असताना ११ ते ११-३० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा खोलून मोबाईल लांबविला. यावेळी मुलांनी मज्जाव केला तरीही तो व्यक्ती मोबाईल घेवून गेला. रिंकेश पवानी हे ११-३० वाजता घरी परतल्यावर हा प्रकार त्यांच्या मुलांनी त्यांना सांगितला. तेव्हा त्यांनी शोध घेतला असता तो अज्ञात व्यक्ती मिळून आला नाही. अखेर त्यांनी सोमवारी, ४ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल केला आहे.