साईमत, यावल : प्रतिनिधी
यावल नगरपरिषदेच्या मालकीचे साठवण तलाव, जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ आदी महत्त्वाची यंत्रणा चालविणे आणि देखभाल करण्यासाठी ठेकेदारीच्या माध्यमातून मजुरांची नियुक्ती केली आहे. या प्रक्रियेत संबंधित ठेकेदार, यावल नगरपालिका मुख्याधिकारी आपल्या सोयीनुसार मजुरांना बिले देऊन कारभार करीत असल्याने ही अति महत्त्वाची आरोग्य विषयक कामे करून घेताना नियुक्त मजुरांची पात्रता, बौद्धिक क्षमता खड्ड्यात घालून यावल नगरपरिषद आर्थिक उलाढाल करीत आहे. त्यामुळे यावल शहरातील इतर पात्र ठेकेदार आणि मजूर वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरीता पाणीपुरवठा यंत्रणातील मजूर पुरवठा (काम तत्त्वावर) करण्याबाबत यावल नगर परिषदेच्या मालकीचे साठवण तलाव चालविणे व देखभाल करणे आदी जलशुद्धीकरण केंद्र चालविणे आणि देखभाल करणे, शहरातील जल कुंभ सांभाळणे व शहरात पाणी वितरण करणे आदी कामासाठी वार्षिक ई-निविदा २०२४-२०२५ प्रथम वेळेला काढण्यात आली. निविदा बीड संख्या जीईएम/२०२४/बी/४५५६१६५/३१/१/२०२४ आहे. बीड बंदची तारीख १२/२/२०२४ आणि बीड खुलण्याची अथवा ओपन होण्याची तारीख १२/२/२०२४ होती. तसेच बीड बंद होण्याची तारीख १८० दिवस दिलेली आहे. अशी प्रक्रिया यावल नगरपालिकेने राबविलेली आहे. असे असले तरी काही ठेकेदारांना या प्रक्रियेतून पद्धतशीरपणे डावलण्यात आल्याने ठेकेदारांसह त्यांच्या मजूर वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मागीलवर्षी या कामांसंदर्भातील ठेकेदार हा पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरील असल्याने मात्र टेंडरमध्ये नमूद काही कामाच्या ठिकाणी मजूर मात्र अनियमित हजर राहून काही मजूर हजर नसताना (उंटावरून शेळ्या चार) कामे करीत होते. या मजुरांना शासकीय नियमानुसार रोज दिला गेला आहे का? तसेच शासकीय मजुरीचा दर काय आणि मजूराला प्रत्यक्षात किती रोज दिला गेला? त्याची खात्री आणि चौकशी यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाने केली आहे किंवा नाही, जे मजूर नमूद ठिकाणी काम करीत आहे त्यांची पात्रता आणि बौद्धिक क्षमता अटी शर्तीनुसार आहे किंवा नाही, याबाबत यावल शहरात ठेकेदारी, मजूर वर्गात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व मजुरांचे जाब जबाब घेतल्यास वस्तुस्थिती लक्षात येईल, असेही यावल शहरात चर्चिले जात आहे.
