Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»The Little One Was Killed : भरधाव रिक्षाच्या धडकेत चिमुकली जागीच ठार
    क्राईम

    The Little One Was Killed : भरधाव रिक्षाच्या धडकेत चिमुकली जागीच ठार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 26, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मेहरूण भागातील घटना, रुग्णालयात आईचा हेलावणारा आक्रोश

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

    शहरातील मेहरूण भागातील ममता हॉस्पिटलजवळ खेळत असलेल्या ६ वर्षीय चिमुकलीला अज्ञात रिक्षा चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत जबर धडक दिली. धडकेत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी सकाळी १२ ते १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत चिमुकलीचे मनिषा जयसिंग बारेला (वय ६, रा. नागलवाडी, ता. चोपडा, हल्ली मु. मेहरूण, जळगाव) असे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

    सविस्तर असे की, स्थानिक ठेकेदार अहमद खान यांच्याकडे बांधकाम व्यवसायावर मनीषाची आई ही हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत होती. मनिषा ही मराठी शाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होती. दरम्यान, ममता हॉस्पिटलजवळ बांधकाम व्यवसायाच्या कामावर मनिषाची आई ही मंगळवारी नेहमीप्रमाणे काम करत होती. मनिषाही बाजूलाच खेळत होती. अचानक रस्त्याच्या बाजूला मनीषा गेल्यावर तेथे भरधाव रिक्षाने तिला समोरून धडक दिली. त्यात मनिषा बारेलाच्या तोंडाला, पायाला जबर मार बसला.

    आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले…!

    यावेळी ठेकेदार अहमद खान यांनी नागरिकांच्या मदतीने चिमुकलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हा तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मयत घोषित केले. यावेळेला रुग्णालयात मनिषाच्या आईचा मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. दरम्यान, मनिषाचे वडील देवसिंगही पाच वर्षांपूर्वी एका बस अपघातात मयत झाले असल्याची माहिती मिळाली. मयत मनिषाच्या पश्चात आई, मामा असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.