निसर्ग चित्रातील रेखीवपणा वेधतो लक्ष – डॉ. केतकी पाटील

0
37

साईमत जळगाव प्रतिनीधी

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे कलाशिक्षक दत्तू शेळके यांच्या पोनोरोमा या चित्रकला प्रदर्शनाचे पु. ना. गाडगीळ गॅलरीत गोदावरी फौंडेशन सचिव डॉ. वर्षा पाटील व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांच्याहस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.

चित्रकला प्रदर्शनात कला शिक्षक दत्तू शेळके यांनी काढलेले निसर्ग चित्र हे खूप मनभावक असे आहे. निसर्गचित्रातील रेखीवपणा आणि प्रत्येक स्ट्रोक हा दत्तू शेळके यांच्या कलेचा उत्तुंग आणि मनस्वी परिचय आहे, असा आभास प्रत्येक चित्र पाहतांना होत असल्याचे डॉ केतकी पाटील म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर गोदावरी फौंडेशन सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ केतकी पाटील, चोपडा येथील माजी प्राचार्य राजेंद्र महाजन, पु ना गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक संदीप पोतदार यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रसिद्ध चित्रकार श्याम कुमावत सर, चित्रकार पवार सर यांच्या सह अनेक कलाप्रेमी जळगावकर यावेळी उपस्थित होते. येत्या १५ एप्रिल पर्यंत पु. ना. गाडगीळ सन्स येथील कला दालनात हे प्रदर्शन सुरू राहणार असून कला प्रेमींनी आवर्जून प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन गोदावरी फौंडेशन संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here