सुवर्णकार संस्थेतर्फे ॲड.केतन सोनार यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील संत शिरोमणी नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७८२ व्या जयंतीनिमित्त रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्राच्या गल्लीतील संस्थेचे माजी सचिव ॲड.केतन भिकन सोनार यांच्या निवासस्थानी जयंती महोत्सव नुकताच साजरा नुकताच करण्यात आला. यावेळी इस्कॉन परिवाराचे प्रभुजी सुनील जाखेटे (सी.ए.), माजी नगरसेविका रंजना वानखेडे, सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष संजय विसपुते, विजय वानखेडे, रमेश वाघ, प्रशांत सोनार, जीवन सोनार, जगदीश देवरे, संजय पगार, बबलू मामा, विजय सोनार, सटाणा येथील श्री.दुसाने, डॉ.विजय बागुल यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनील जाखेटे यांचे नामसंकीर्तन करण्यात आले.
यावेळी पूजा केतन सोनार यांनी विशेष प्राविण्य मिळवून वकिली क्षेत्रात पदार्पण करून सनद प्राप्त केली. त्याबद्दल त्यांचा रंजना वानखेडे, मीना वाघ, माधुरी सोनार, गिता सोनार, नयना सोनार, दीपाली सोनार, ज्योती सोनार यांच्यासह उपस्थित महिला मंडळाने सत्कार केला. तसेच ॲड.केतन सोनार यांनी नोटरी प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही संस्थेच्यावतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता महाआरतीनंतर प्रसाद वाटप करून झाली. यशस्वीतेसाठी जयेश सोनार, शरद सोनवणे, राजेंद्र दुसाने, यशवंत वडनेरे, सुनील सोनार, बी.एस. पिंगळे, पुरुषोत्तम सोनार, नितीन बिरारी आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जगदीश देवरे यांनी केले.