Jalgaon LCB Team : जळगाव एलसीबीच्या पथकाने सोलर पंप चोरट्यांना पकडले

0
7

तिघांना दिले एरंडोलला पोलिसांच्या ताब्यात

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

ट्रकमधून सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरी करणाऱ्या चोरट्यांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील तपासकामी एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक केलेल्या तिघांची आकाश लालचंद मोरे, भरत बाबुराव बागुल, पृथ्वीराज रतीलाल पाटील अशी नावे आहेत. चोरीप्रकरणी गेल्या ३१ मे २०२५ रोजी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला होता. एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळ रस्त्यावर घडलेल्या चोरीच्या घटनेत २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरट्यांनी ट्रकमधून चोरुन नेले होते. गुन्ह्याचा समांतर तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.

गुप्त बातमीदारासह तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून हा गुन्हा आकाश लालचंद मोरे (वय २३, रा. मुगपाठ-पद्‌मालय, ता.एरंडोल) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती निष्पन्न झाली होती. त्या माहितीच्या आधारे आकाश यास नागदुली गावाजवळ असलेल्या पदमालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले. हा गुन्हा त्याने भरत बाबुराव बागुल (३२, केवडीपुरा, ता.एरंडाेल), पृथ्वीराज रतीलाल पाटील (२०, रा.वरखेडी, ता.एरंडोल), पंकज रवि बागुल यांच्या साथीने केला असल्याचे त्याने कबुल केले. त्या माहितीच्या आधारे तपासाअंती आकाश मोरे, भरत बागुल, पृथ्वीराज पाटील असे तिघे जण पोलीस पथकाच्या हाती लागले. त्यांना एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील तपासकामी दिले आहे. तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे, हे.कॉ. संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे, पो.कॉ.राहुल कोळी, दीपक चौधरी यांच्या पथकाने सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here