Citizens Block The Road Movement ; क्रांती चौकातील अपघातांचा प्रश्न आला ऐरणीवर ; नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

0
10

अधिकाऱ्यांकडून गतिरोधकाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन घेतले मागे

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील क्रांती चौकात एका मोटरसायकल अपघातात एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी, २७ मे रोजी दुपारी २ वाजता घडली. अपघातानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय बांदल यांच्यासह परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतुकीचा रस्ता मोकळा केला. आंदोलनकर्ते यांना रस्त्याच्या बाजूला करून समज देण्यात आली. मात्र, जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. दरम्यान, आंदोलनामुळे क्रांती चौकातील अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आंदोलनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सूर्यवंशी यांनी भेट देत याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी मान्य केली. अधिकाऱ्यांनी गतिरोधकाचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. जखमी मुलावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here