Chief Engineer Prashant Sonwane : अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणेंच्या नाविन्यपूर्ण कामगिरीचे उपमुख्यमंत्र्यांकडून उत्स्फूर्त कौतुक

0
15

सार्वजनिक बांधकाम विभागाची कामगिरी कौतुकास्पद ठरविणारे जिल्ह्यातील पहिलेच ठरले अधीक्षक अभियंता

साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : 

राज्यातील म्हणा की जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या विभागाचे अभियंते कायम टिकेचे धनी राहिलेले आहेत. त्यांच्या कामांचे कौतुक तर खूप दुर्मिळ बाब आहे, पण हा समज किंवा ओळख जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी पुसुन काढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कामगिरी कौतुकास्पद ठरविणारे जिल्ह्यातील बहुधा श्री.सोनवणे पहिलेच अधीक्षक अभियंता असावे. विशेषत: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उत्स्फूर्तपणे कौतुक करावे, हे तर खूपच अनपेक्षित आहे. काहीही असो श्री. सोनवणे यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेच्या जोरावर या विभागाची शान वाढविली आहे, हे मात्र निश्चित.

ही प्रस्तावना मांडण्याचे कारण की, अधीक्षक अभियंता यांनी जामनेर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे उभारलेले पुतळे, चाळीसगावमध्ये उभारलेली प्रशासकीय इमारत, जामनेरमध्ये राजमहालसारखा उभारलेला विश्रामगृह हे तर स्थापत्य अभियांत्रिकीचे नाविन्यपूर्ण आणि राज्यभरात कौतुक व्हावे, अशी त्यांची कामगिरी ठरली आहे. पण त्याहीपेक्षा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या पुढाकाराने अमळनेर तालुक्यातील नदीवरील बांधलेल्या पुलाखालील भागात उभारलेले ‘आर्च बंधारे’ हे तर अभियांत्रिकेचा अप्रतिम आगळावेगळा प्रकल्प ठरला आहे. ९४ कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या एकूण आर्च बंधाऱ्यांपैकी १६ बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहेत.

पर्यटन विभागाचा ‘बॅक वूडस इमराल्ड रिसोर्ट’ अभूतपूर्व ठरला प्रकल्प

जामनेर तालुक्यातील गारखेड्याजवळ वाघूर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात उभारण्यात आलेले ‘बॅक वूडस इमराल्ड रिसोर्ट’ हा पर्यटन विभागाचा अभूतपूर्व प्रकल्प ठरला आहे. अर्थात प्रकल्पाला मंत्री गिरीष महाजन यांची इच्छाशक्ती आणि सक्रीय पाठबळ श्री.सोनवणेंना लाभले. त्यामुळे त्यांनी आपले अभियांत्रिकी कौशल्यपणाला लावून ते यशस्वी करुन दाखविण्याची संधी मिळाली. अशा सर्व कामांचे नियोजन मंडळाच्या आढावा बैठकीत ‘प्रेझेंटेशन’ बघितल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा प्रभावीत झाले.त्यांनी मी पूर्ण राज्यभरात फिरत असतो. पण अशा पध्दतीचे अभूतपूर्व काम बघून मी भारावून गेलो आहे, असे सांगत त्यांनी श्री.सोनवणेंच्या कार्य कौशल्याचे उत्स्फूर्तपणे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here