अक्कलकुवा ग्रा.पं.च्या आर्थिक व्यवहाराची माहिती २ महिन्यात अवगत होणार

0
19

साईमत, अक्कलकुवा : प्रतिनिधी

अक्कलकुवा ग्रामपंचायतीमधील २०१९ ते २०२२ आणि १ मार्च २०२३ ते अखेर पर्यंतची माहिती विस्तृत स्वरुपाची आहे. आर्थिक व्यवहाराची असल्याने माहिती तयार करण्याकामी किमान २ महिन्याचा कालावधी लागेल. ही माहिती २ महिन्यात अवगत करण्यात येईल, असे लेखी निवेदन भाजपाचे विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांना अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन जावरे यांनी अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थित दिल्यावर तुर्त आयोजित रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे.

याबाबत भाजपाचे विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन ४ सप्टेंबरपर्यंत २०१६-२०२३ पर्यंतच्या कालावधीत ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवा अंतर्गत झालेल्या विकास कामांचे मक्तेदारांकडून २ टक्क्याप्रमाणे जीएसटी व १ टक्के प्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरणा वसूल करण्यासाठीची कार्यवाही संदर्भात माहिती मागणी करत रास्ता रोको आंदोलन आयोजित केले होते. त्याअंनुषगाने पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या दालनात गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तार अधिकारी पवार, ग्रामविकास अधिकारी नितीन जावरे, विधानसभा प्रमुख नागेश पाडवी, ग्रामपंचायत सदस्य संदीप मराठे, दिलीप परदेशी, नाला सरपंच भुपेंद्र पाडवी, अविनाश पाडवी उपस्थित होते.

२०१६ ते २०१९ पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल यापूर्वी सादर केला आहे. उर्वरित २०१९ ते २०२२ आणि १ मार्च २०२३ ते आज अखेरपर्यंतची माहिती विस्तृत स्वरुपाची आहे. आर्थिक व्यवहाराची असल्याने माहिती तयार करण्याकामी किमान २ महिन्याचा कालावधी लागेल ही माहिती २ महिन्यात अवगत करण्यात येईल, असे लेखी ग्रामविस्तार अधिकारी नितीन जावरे यांनी दिल्यावर तूर्त आयोजित रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here