विविध कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
येथील भारतीय जैन संघटनेला पुणे येथील राष्ट्रीय अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांच्या हस्ते जामनेरातील खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत व कार्यकारणी सदस्यानी स्वीकारला.
जामनेर शाखेने २०२३ व २४ मध्ये ६ स्मार्ट गर्ल शिबिर, दोन हजार वृक्षारोपण, रक्त तपासणी शिबिर,महिला दिनानिमित्त २१ प्रभावशाली महिलांचा नारी शक्ती सन्मान पुरस्कार, जैनिज्म इन एक्शन – धार्मिक सेशन, स्वातंत्रदिनानिमित्त गौशाळेत चारा वितरण, प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण, योगादिन निमित्त तीन दिवसीय योगा शिबीर व योग शिक्षकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थी व तपस्वी यांचा सत्कार, स्वास्थ शिबिर, अनाथालयात अन्नदान, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या व्यक्तिमत्वचा सत्कार,मूल्यवर्धन शिक्षणाचा येथील शाळेत शुभारंभ, जैन अल्पसंख्यांक लाभ जनजागृती अभियान, चार रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन केले होते.
यशस्वीतेसाठी जामनेर शहराध्यक्ष अतुल कोठारी, महिला अध्यक्ष सांगिता मंडलेचा, खानदेश कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडा, सोनल कोठारी, जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढ़ा, सचिव डॉ हर्षल बोहरा, शहर सचिव जय बोहरा,सह सचिव विकास कोठारी, सदस्य डॉ.नरेन्द्र रांका, विकास ललवाणी, महिला कार्याध्यक्ष मोना चोरडीया, उपाध्यक्ष शितल चोरडीया, सचिव अनुकंपा बरडिया, सह सचिव स्नेहल मुनोत, सदस्य राखी लोढ़ा, भावना बोहरा, कांचन कुचेरिया, नीता लोढ़ा, भारती रांका, प्रिया कोठारी आदींनी परिश्रम घेतले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल जैन संघटनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, सचिव दीपक चोपडा, राज्याध्यक्ष केतन शाह, राज्य उपाध्यक्ष विनय पारख, सचिव प्रवीण पारख,सहसचिव विजय दुगड,राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक श्रीश्रीमाळ, विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा, सचिव अशोक राखेचा,ओसवाल जैन संघाचे अध्यक्ष ईश्वरलाल कोठारी आदींनी अभिनंदन केले.
