आसोद्यातील सार्वजनिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात एस.के.राणे राजपूत यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरचा वर्तमान लक्षात घेता भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले अधिकार हक्क या जाणिवेतूनच भारतीय लोकशाहीतील भारतीय संविधान भारतीय नागरिकांचा आत्मा आहे. त्यामुळे त्याची जपणूक करण्याची जबाबदारी सर्वस्वी नागरिकांची आहे. पुढच्या पिढीसाठी आत्मभान जपण्याची गरज असल्याचे मत एस. के. राणे राजपूत यांनी केले. आसोदातील सार्वजनिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव विलासराव चौधरी, पर्यवेक्षक एल. जे. पाटील, डी. जी. महाजन उपस्थित होते.
याप्रसंगी शाश्वती माळी, मंगल चव्हाण, प्रज्ञा कापडणे या विद्यार्थ्यांनी संविधान दिनाविषयी माहिती दिली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे भारती पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शुभांगिनी महाजन तर आभार संतोष कचरे यांनी मानले.