अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश बेकायदेशीर अन्‌ असंवैधानिक

0
87

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु हा संविधानाच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे. असे झाल्यास त्यामुळे नागरिकांमध्ये भय आणि मानवी विषमता निर्माण होईल.तसे होऊ नये याकरिता मनुस्मृतीसारख्या विषमतावादी विचारांचा व धोरणांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येऊ नये, अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुक्ताईनगरतर्फे दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार डॉ.निकेतन वाळे यांना तसेच पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात भगवद्गीता, मनाचे श्‍लोक आणि मनुस्मृती यासारख्या विषमतावादी विचारांचा व धोरणांच्या समावेश करणे या बाबी भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकार कलम १३, १४, १७, १९, २१, २८ नुसार बेकायदेशीर व असंवैधानिक आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करणे आक्षेपार्ह आहे. तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि नैसर्गिक न्यायाच्या संकल्पनेला काळीमा फासणारी बाब आहे. संविधानाची प्रास्ताविका अनुच्छेद १३ ते ३२ पर्यंतचे मूलभूत अधिकार आणि भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य या मूल्यांचा समावेश करावे की, ज्यामुळे भारतीय नागरिक आपल्या हक्क आणि अधिकारासंबंधी तसेच कर्तव्य संबंधित जागृत होतील तेच देशासाठी हितकारक आहे. अशा प्रकारे दुरुस्ती न झाल्यास दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल तसेच संविधान समर्थक विविध संघटनांच्यावतीने महाराष्ट्र राज्यात राज्यभर तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटतील. त्यासोबतच तीव्र आंदोलन छेडण्यात येतील, त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, याची नोंद घ्यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, सचिव जनार्दन बोदडे, कोषाध्यक्ष पंडित सपकाळे, माजी तालुकाध्यक्ष शरद बोदडे, वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर, समता सैनिक दलाचे प्रमोद पोहेकर, मनोज पोहेकर, गोपाळ धुंदले, बापू ससाणे, मुकेश वानखेडे, मोहन मेढे, डॉ.अ.फ. भालेराव, प्रमोद सौंदळे, भीमराव इंगळे, फकीरा बोदडे, बुद्धभूषण मोरे, आशाबाई पोहेकर, भारती तायडे, किशोर पोहेकर, महेंद्र बोदडे, सुशांत बोदडे, उत्तम प्रधान, विनोद साबळे, उषा मोरे, वैभव पाटील, पवन वानखेडे, सुनील गायकवाड, मिलिंद भालेराव, संध्या हिरोळे, गोविंदा तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here