भारतीय संविधानाचे महत्त्व पिढीपर्यंत पोहोचवण्यावर भर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
प्रतिमा आणि बोधचिन्हाला आदिम इतिहास आहे. ती समूहाची अस्मिता आहे. तसेच चित्रकाराला दृष्टी, डोळसपणा, बुद्धी व कल्पकता आवश्यक आहे. त्यासाठी व्यासंग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन फाय फाउंडेशन पुरस्कार प्राप्त तथा चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी केले.अभियंता भवनात आयोजित संविधान सन्मान संमेलनाच्या बोधचिन्हाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संयोजक मुकुंद सपकाळे होते. याप्रसंगी स्वागताध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय लोकशाहीला संविधानाने जागतिक स्तरावर कीर्ती मिळवून दिली आहे. प्रत्येक भारतीयाची जबाबदारी संविधानाचे रक्षण करणे असल्याचे अध्यक्षीय मनोगताता मुकुंद सपकाळे यांनी अधोरेखित केले. विचार मंचावर संजय इंगळे, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी, समीक्षक जयसिंग वाघ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीकांत बाविस्कर, शशिकांत हिंगोणेकर, डॉ. बनसोडे, सुभाष सपकाळे, दिलीप सपकाळे, संतोष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजेंद्र पारे, आधार सपकाळे, डिगंबर सुरवाडे, मंगल पाटील, ॲड. आनंद कोचुरे, पुष्पा साळवे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यशस्वीतेसाठी महेंद्र केदार, दादू सपकाळे, भारती रंधे, चेतन नन्नवरे, जगदीश सपकाळे, विजयकुमार मौर्य, रमेश सोनवणे, चंद्रगुप्त सुरवाडे, सुनील सोनवणे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल, सूत्रसंचालन प्रा. प्रीतीलाल पवार तर आभार अनिल सुरडकर यांनी मानले.