Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»गावठाण जागा मालकी हक्कासह नकाशा वाटप मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
    जळगाव

    गावठाण जागा मालकी हक्कासह नकाशा वाटप मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 30, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    महास्वामीत्व योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सनद वाटप कार्यक्रमाचा जळगाव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्र्यांनी प्रारंभ केलेल्या मोहिमेत जिल्ह्यात गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क आणि नकाशाच्या ९५० सनदांचे वाटप केले. त्यातून तीन लाख ९५ हजार रूपयांचा महसूल शासनाला प्राप्त झाला आहे.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी कलाबाई चिंतामण कोळी, कमलबाई रमेश गायकवाड आणि शिवलाल गिरमा सोनवणे या शेतकऱ्यांना पोलीस परेड मैदानावर सनदाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने जिल्ह्यात २६ व २७ जानेवारी २०२४ रोजी सनद वाटप मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली. स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाण सर्वे झालेल्या जळगाव जिल्ह्यातील गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप केल्या आहेत. त्यातून ३ लाख ९५ हजार २८८ रूपयांची सनद फी वसुल केली आहे.

    रावेर तालुक्यातील पिंपरी, पाडले खु., निरूळ, पाडले बु., नेहते, बोरखेडा, मोरगाव खु, चोरवड, कोळोदे, मांगी अशा १० गावात ३२९ सनद वाटप केल्या आहेत. त्यातून १ लाख ५२ हजार ४३३ रूपये सनद फी वसूल केली आहे. जळगाव तालुक्यातील देवगाव, मोहाडी, खेडी खु., पळसोद, वसंतवाडी, आवार, गाढोदे, आमोदे बु. अशा ८ गावात २४८ सनद वाटप केल्या आहेत. त्यातून ९७ हजार ८० रूपये सनद फी वसूल केली आहे. पारोळा तालुक्यातील सोके, हिरापूर, सावखेडे तुर्क, कन्हेरे, मेहु, नेरपाट, सावखेडे होळ, चहुत्रे खोलसर, बाहुटे अशा १० गावात २२६ सनद वाटप केल्या आहेत. त्यातून ८७ हजार २६० रूपये सनद फी वसूल केली आहे. यावल तालुक्यातील पथराळे, हरिपुरा, करंजी, भोरटेक, भालशिव, पिंपरी, गिरडगाव, भालशिव अशा ८ गावात ११२ सनद वाटप केल्या आहेत. त्यातून ४३ हजार ५७० रूपये सनद फी वसूल केली आहे. पाचोरा तालुक्यातील हडसन, कोकडी, वडगाव जोगे, वडगाव आंबे खु. अशा ४ गावात ३५ सनद वाटप केल्या आहेत. त्यातून १४ हजार ९४५ रूपये सनद फी वसूल केल्या आहेत.

    स्वामीत्व योजनेत जळगाव जिल्ह्यातील सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्यात येणार आहेत. गावातील मालमत्तांचे जी. आय. एस. प्रणालीवर आधारीत मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहेत. ड्रोनद्वारे गावठाण भूमापन योजना पूर्ण झाल्यानंतर प्रथम टप्प्यात विशेष स्वरूपात मोहीम घेऊन सनद वाटप व सनद वसूली करून नागरिकांना सनद वाटपाचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी.मगर यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.