>> कोरोना काळातील सेवक योद्ध्यांचा सन्मान
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी
ग्रामीण विकासात अत्यंत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या घटकांच्या संबंधी महायुती सरकार संवेदनशील नाही,शासनाने अंगणवाडी सेविका,मदतनीस व आशा वर्कर यांना मानधन वेतनाऐवजी रोजगाराच्या कक्षेत आणावे, अशी मागणी आ.शिरीषदादा चौधरी यांनी केली.काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनसामान्यांसाठी कार्य तत्पर राहून सेवा देणाऱ्या सर्व परितात्र्यांचा कृतज्ञता सन्मानाचे आयोजन फैजपूर येथे शुक्रवारी करण्यात आले होते यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.
रावेर यावल मतदार संघातील सर्व आशावर्कर,अंगणवाडी सेविका,मदतनीस, आरोग्य कर्मचारी तसेच परिसरातील सर्व डॉक्टर अशा सर्व परितात्र्यांचा यावेळी कृतज्ञता पूर्वक सन्मान केला गेला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतधिकारी बबनराव काकडे,तहसीलदार बंडू कापसे,रावेर बीडीओ दीपाली कोतवाल,यावल बीडीओ मंजुश्री गायकवाड यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे,डॉ.अरुणा चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.
रावेर -यावल तालुक्यातील प्रमुखांशी सुद्धा उपस्थिती :
यावेळी योगिता वानखेडे,मानसी पवार, उल्हासशेठ चौधरी, लिलाधर विश्वनाथ चौधरी, शेखर पाटील,डॉ.राजेंद्र पाटील, किशोर पाटील,मुकेश येवले सर,सोपान बाबुराव पाटील, योगीराज पाटील,सोपान साहेबराव पाटील,प्रल्हाद बोंडे, हरीशशेठ गणवाणी,संजय जमादार,सामजिक कार्यकर्ते जावेद जनाब जफर मेम्बर सुनील लक्ष्मण मोपारी,पांडुरंग पाटील, फिरके सर्फराज तडवी,देवेंद्र चोपडे,नदीम पिंजारी,सतीश आबा पाटील, आत्माराम शंकोपाल,डॉ सुरेश पाटील,अविनाश पाटील, शरद कोळी ,कडू पाटील,संतोष खर्चे नितीन महाजन कदिर खान,रियाज मेंबर,राजू सवरणे, महेबूब पिंजारी, कलीम मेंबर, डॉ.दानिश शेख,धुमा तायडे, सावन मेढे,शरीफ सर,रामराव मोरे,देवेंद्र बेंडाळे,अशोक भालेराव,अप्पा चौधरी,वसीम तडवी,डॉ गणेश चौधरी,रतन बारेला असद भाई सय्यद, युवराज कराड ,विकास पाटील प्रवीण सोनवणे,डॉ राजेंद्र झाबरे,डॉ सुधाकर चौधर,चतुर राणे,रौनक तडवी, पिंटू पवार, सलीम तडवी, अनिल जंजाळे, गणेश गुरव,जयेश चोपडे, वाय.एस.महाजन, छोटू तडवी, लियाकत जमादार,राहुल तायडे, मुस्तुफा तडवी,मुकेश पाटील विनोद झाल्टे,सौद शेख व महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते नागरिकांची उपस्थिती होती.