साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
कवली ग्रामसेवकावर अनेक तक्रारी दाखल असुन सुद्धा कोणतीही कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांसह अर्जदार भ्रमात पडले आहे. गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक पी.एस ढोले यांना आदेशित करुन प्रस्तावाची सत्य प्रत अर्जदाराला देण्याचे कळवले असता संबंधित ग्रामसेवक याने केराची पाटी दाखवून अर्जदाराला उडवा ऊडवीचे उतर दिले आहे. तसेच मला ज्याने रक्कम दिली त्याचेच मी ठराव दाखल केले आहे व ज्याने पैसे दिले त्याचेच ड यादीत मी ठरावामध्ये वर नाव घेतलेले आहे. तुम्ही मला रक्कम दिलेले नाही तुम्हाला जिथे जायचे तिथे जा. माझे कोणीही बरेवाईट करु शकत नाही. अशी उद्धट भाषा वापरुन सदर ग्रामसेवकने अर्जदाराचे मनःस्थिती दुखावली. तरी गटविकास अधिकारी हे संंबंधित ग्रामसेवकावर कार्यवाही करतील का सांगड घालून मिलीभगत करतील? या कडे समस्त गावकरी मडंळी चे व अर्जदाराचे लक्ष लागून आहे.
सदर ग्रामसेवक याने कवली हे गाव विकासा पासून कोसो दुर ठेवले आहे. व जानुन बुजुन ड यादीमध्ये पात्र लाभार्यांना वंचित ठेवणारे ग्रामसेवक याच्या वर कारवाई साठी मिलीन साळवे ( रा. कवली) यांनी निवेदन दिले आहे. सोयगाव पंचायत समिती कार्यालयातील फोफावलेल्या भ्रष्टाचाराकडे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष घालतील अशी सोयगावकरांची अपेक्षा आहे.