भागलपूर :
देशभरातील सरकारी शाळांची दुरावस्था कोणापासून लपून राहिलेली नाही. सरकार कितीही दावे करत असले तरी खरी परिस्थिती वेळोवेळी समोर येत असते. अशात बिहारमधून एक ताजे प्रकरण समोर आले आहे. ज्यात शाळेची झालेली दुरुवस्था पाहून लोक सरकारने इकडेही लक्ष द्या अशी विनंती करत आहे. सोशल मीडियावर दुरावस्था झालेल्या शाळेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राज्यातील एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना पावासाळ्यात शाळेचे छत गळत असल्याने वर्गात रोज छत्री घेऊन बसण्याची वेळ आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ बिहारमधील भागलपूरच्या गोपालपूर ब्लॉकमधील सैदपूर हायस्कूलमधील आहे. जो भाजप नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, बिहारमधील सरकारी शाळांची अवस्था अशी आहे की, पावसाच्या दिवसात विद्यार्थ्यांना छत्री घेऊन वर्गात बसावे लागतेय. एकीकडे बिहारचे शिक्षणमंत्री राम चरित्र मानसची चर्चा करत आहेत आणि मुख्यमंत्री नितीशबाबू पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहेत, तर दुसरीकडे बिहारमधील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे! ना शिक्षण ना रोजगार. फक्त भ्रष्टाचार.
यावर अनुज नावाच्या युजरने लिहिले की, ‘निर्लज्जपणाचीही एक मर्यादा असते, गेली २० वर्षे एकत्र सत्तेत वाटा होता तेव्हा दिसले नाही. ६ महिन्यांत संपूर्ण छत गळू लागले. सत्य हे आहे की, भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांकडे असलेली सर्व खाती नष्ट झाली आहेत.