साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
गेल्या महिन्याभरापासून अमळनेर तालुक्यात पाऊस पडलेला नाही. म्हणून अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करून शासनाने जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, अशी मागणी अमळनेर तालुका शिवसेना (उबाठा) तर्फे केली आहे. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना नुकतेच देण्यात आले.
तालुक्यात महिनाभर पाऊस खंडित झाल्याने पिकांचे हाल झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे गेले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा किंवा नुकसानापोटी अनुदान देण्यात यावे. तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल म्हणून शासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील, शहरप्रमुख सुरज परदेशी, विजय पाटील, प्रताप शिंपी, रवींद्र पाटील, नितीन निळे, राजेंद्र पाटील, रणजित पाटील, साहेबराव पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.