Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील
    क्राईम

    आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत,  जळगाव : प्रतिनिधी

    भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी, ६ ऑगस्ट रोजी गोंडगाव येथे पीडिताच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक ग्रामस्थ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

    भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना गेल्या ३० जुलै रोजी घडली होती. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय १९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याने घटनेची कबुलीही दिली आहे. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता.

    महिन्याभरात निकाल लावण्यात येईल
    पीडिताच्या कुटुंबाचे शासनाच्यावतीने पुनर्वसन तर करण्यातच येईल. मात्र, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन बांधील आहे. आठ दिवसांच्या आत या घटनेत चार्जसीट दाखल करत हा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून महिनाभरात निकाल लावण्यात येईल. शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबास लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभही देण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

    ग्रामस्थांवरील दाखल गुन्हे त्वरित मागे घेण्याच्या सूचना
    सांत्वनपर भेटीत पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या घटनेनंतर आरोपीला अटक करून घेऊन जाताना ग्रामस्थांकडून उत्स्फूर्तपणे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. पोलीस व्हॅनवर अनावधानाने दगडफेकीची घटना झालेली होती. त्यावर पोलीस विभागाने चार ते पाच ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले होते. ग्रामस्थांवरील दाखल गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.