Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»अर्थ»मुल्यवर्धित कराच्या तफावतीची सरकारला ‘अशीही’ नशा; परमिटरूमचालकांची धोरणाच्या ‘उताऱ्यासाठी’ धावपळ !
    अर्थ

    मुल्यवर्धित कराच्या तफावतीची सरकारला ‘अशीही’ नशा; परमिटरूमचालकांची धोरणाच्या ‘उताऱ्यासाठी’ धावपळ !

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुल्यवर्धित कराच्या तफावतीची सरकारला ‘अशीही’ नशा; परमिटरूमचालकांची धोरणाच्या ‘उताऱ्यासाठी’ धावपळ !

    श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

    परमीट रुम व वाईन शॉपवरील व्हॅट टॅक्स तफावतीमुळे बेकायदेशीर मद्यविक्रीत वाढ होवून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचा आरोप श्रीरामपूर तालुका लिकर असोसिएशनचे माजी सल्लागार सुनील मुथा यांनी केला आहे.

    प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातमुथा यांनी म्हटले आहे की, परमिट धारकांना विक्री केलेल्या मद्यावर दहा टक्के व्हॅट टॅक्स भरावा लागतो. परंतु वाईन शॉप आणि बिअर शॉपीमधून विक्री केलेल्या मद्यावर मात्र व्हॅट टॅक्स भरावा लागत नाही. परिणामी ग्राहकांना परमिटरूम मधील मद्यावर पंचवीस ते तीस रुपये प्रतिबाटली मागे जादा मोजावे लागतात. किमतीतील या तफावतीमुळे ग्राहकांनी परमिट रूमकडे पाठ फिरवली असून परमिट रुम चालकांना दैनंदिन खर्च भागवणेही अवघड होऊन बसले आहे.

    वाईन शॉपमधून आणलेल्या मद्यावर टॅक्स भरावा लागत नसल्याने बहुतांश परमिट रूम चालकही अधिकृत विक्रेत्यांकडून मद्य घेण्याऐवजी सर्रास वाईन शॉपमधून मद्य खरेदी करून विकत आहेत. त्यांना असे बेकायदेशीर कृत्य करण्यास शासनच भाग पाडत आहे. वाईन शॉपमध्ये कमी किमतीत मिळणाऱ्या मद्यामुळे बेकायदेशीर मद्य विक्री वाढली असून खेडोपाडी आणि गल्लोगल्ली झालेल्या हॉटेल्समधून सर्रास अवैध मद्य विक्री केली जात आहे. परिणामी लाखो रुपये फी आणि विविध टॅक्स भरण्यापेक्षा चिरीमिरी देऊन अवैध हॉटेल चालविणे सोयीचे असल्याची भावना परमिट रूम धारकांमध्ये वाढीस लागली आहे. बहुतांश परमिट धारकांनी परवान्याचे नूतनीकरण अद्याप केलेले नाही. राज्य शासनास कोट्यवधीच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे, असे मुथा यांनी म्हटले आहे.

    शासनाच्या मद्य धोरणाच्या निषेधार्थ 20 मार्च रोजी राज्यातील परवानाधारक हॉटेल चालकांनी बंद पुकारला होता. आमदार वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार व उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत हॉटेल चालकांची चर्चा झाली. त्यावर एक-दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.