उत्राण अ.ह.ला मुस्लिम बांधवांच्या शादी घराची पायाभरणी

0
24

साईमत, कासोदा, ता. एरंडोल : वार्ताहर

एरंडोल तालुक्यातील उत्राण अ.ह. येथे मुस्लिम बांधवांच्या शादी घराची (जानूसा) नुकतीच पायाभरणी करण्यात आली. यासाठी जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर धोंडू आमले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुस्लिम बांधवांच्या लग्नात वराडला उतरण्यासाठी गावात कोणतीही अशी जागा नव्हती. ही समस्या लक्षात घेऊन ज्ञानेश्‍वर आमले यांनी मुसलमानांच्या लग्नाच्या वराडांसाठी व्यवस्था केली. याबद्दल आमले यांचे मुस्लिम बांधवांनी आभार मानून गावात कौतुक होत आहे.

उत्राण अ.ह. गावात सर्व पुढाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शादी घर (जानूसा) करण्याचे काम आम्ही करून देऊ, असे आश्‍वासन मुसलमान बांधवांना दिले होते. मात्र, ते आश्‍वासन कोणीही पूर्ण न केल्याने ते हवेतच विरले होते. त्यामुळे ज्ञानेश्‍वर आमले यांनी त्याची दखल घेऊन शादी घर करण्यासाठी सतत प्रयत्न सुरु ठेवले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. उत्राण गावात शादी घरचे काम सुरू करण्यात आले. यासाठी राजू पवार, खलील पहेलवान, इकबाल भाऊ, राजू पवार, राहुल पवार हे कोणत्याही कामासाठी एरंडोलला गेल्यावर ज्ञानेश्‍वर आमले यांच्याकडे ह्या विषयाबाबत चर्चा करीत होते. मुसलमानांच्या शादी घरसाठी राजू पवार यांनीही विशेष प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांनाही यश आले आहे.

शादी घरच्या पायाभरणीप्रसंगी उत्राण अ.ह.चे नवनिर्वाचित सरपंच रजनी धनगर यांचे पती तथा धरणगाव बाजार समितीचे माजी संचालक आनंदा धनगर, उपसरपंच हारुण देशमुख, खलील पहेलवान, राजू सिकंदर, इक्बाल लतीफ, जुबेर बेलदार, मौलाना साबीर, मुस्लिम पंच कमिटी सदस्य, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी साबीर मौलाना यांनी शादी घराजवळ सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन या कामासाठी ईश्‍वरचरणी प्रार्थना केली. नंतर पायाभरण खोदण्याच्या कामाला प्रारंभ झाला. पायाभरणीच्या मोजमापवेळी राहुल पाटील, संदीप आमले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here