शिवलिंग पितळी आवरणाच्या अभिषेकासह विविध कार्यक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळा शिवारातील सोनी नगरात मनोकामना पूर्ती करणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिराला ७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे शुक्रवारी, ११ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता स्थापना दिनानिमित्त शिवलिंगाला पितळी आवरण बसविण्यात येईल. मंदिराच्या स्थापनादिनानिमित्त राजेश वाणी, गणेश राणे, प्रकाश गजाकुश यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राक्षाभिषेक त्यानंतर सकाळी ९ वाजता महाआरती होईल. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येईल, असे नरेश बागडे यांनी सांगितले.
जागृत स्वयंभू महादेव मंदिराची स्थापना गेल्या ११ जुलै २०१८ रोजी केली होती. त्यानंतर दानशूर दाते यांच्या सहकार्याने
मंदिराचा जिर्णोद्धार झाले आहे. मनोकामना पूर्ण होत असल्याची भावना परिसरातील सोनी नगर, श्रीराम नगर, ओमकार पार्क, बाबुराव नगर, विजय नगर, अथर्व रेसिडेन्सी, गणपती नगर, प्रल्हाद नगर, पांडुरंग साई नगर, सुख अमृत नगर, आनंद मंगल सोसायटी, मयूर कॉलनी, पिंप्राळा गाव, सावखेडा, चंद्रकला रेसिडेन्सी, मुरली मनोहर अपार्टमेंट येथील सर्व भाविकांची असल्याने मंदिरात दररोज गर्दी होते.
कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन
मंदिराच्या स्थापनादिनानिमित्त चेतन कपोले महाराज यांच्या अमृतवाणीतून पहाटेपासून जागृत स्वयंभू महादेव शिवलिंगचा मंत्रोच्चाराने जलाभिषेक, दुग्धाभिषेक करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता महादेव शिवलिंगाला पितळीचे आवरण बसविण्यात येईल. कार्यक्रमाचा परिसरातील सर्व भाविकांनी लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नरेश बागडे यांनी केले आहे.