Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»The First Satpuda Jungle Safari : उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या सातपुडा जंगल सफारीला प्रारंभ
    जळगाव

    The First Satpuda Jungle Safari : उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या सातपुडा जंगल सफारीला प्रारंभ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 2, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पालकमंत्र्यांनी सफारीचे दोन तिकीट केले बुक

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    सातपुडा जंगल सफारीचा पहिला टप्पा सुमारे अडीच कोटी रुपये निधीतून पूर्ण केला आहे. सुरुवातीला फक्त मूलभूत पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यात प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, पाच सफारी वाहने, १८ प्रशिक्षित गाईड आणि चालकांची नियुक्ती यांचा समावेश आहे. जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारीला प्रारंभ झाला आहे.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सफारीचे दोन तिकीट बुक केले आहे. दरम्यान, सातपुड्याच्या कुशीत वसलेली ही अभयारण्यसंपन्न जागा जैवविविधतेचे संरक्षण, पर्यावरण पर्यटन आणि स्थानिक रोजगारासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

    यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी जंगल सफारीत तब्बल दीड तास सहभाग घेत परिसराचा अनुभव घेतला. त्यांच्यासोबत आ.अमोल जावळे, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्यासह वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला वन विभागातर्फे पालकमंत्र्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सफारी दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती जाणून घेतली.

    सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती

    सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. त्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही केवळ सफारी नाही तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे. पाल परिसराला नवा चेहरा मिळणार आहे. तरुणांनी येथे छोटे-मोठे हॉटेल्स, खानावळी उभाराव्यात. प्रत्येक कुटुंबाने एकदा तरी येथे येऊन निसर्गाचा अनुभव घ्यावा. कारण हा श्वास जगण्याचा आनंद शिकवतो, असे भावनिक आवाहन सातपुडा जंगल सफारीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

    ‘डार्क स्काय पार्क’ची उभारणी व्हावी

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून खान्देशातील पहिली जंगल सफारी उभारल्याचा अभिमान आहे. येथील निसर्ग जतन करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. परिसरात ‘डार्क स्काय पार्क’ची उभारणी व्हावी, अशी विनंती मंत्री पाटील यांच्याकडे केली असल्याचे आ.अमोल जावळे यांनी सांगितले.

    जंगल सफारीचा घेतला आनंद

    जंगल सफारीसाठी एका गाडीचे तिकीट अडीच हजार रुपये आहे. पालकमंत्र्यांनी पाच हजार रुपये देऊन दोन गाड्यांचे बुकिंग केले. या अर्थाने ते पहिले पर्यटक ठरले. त्यानंतर दीड तास पालकमंत्री, आमदार आणि अधिकारी यांच्यासह जंगल सफारीचा आनंद घेतला. प्रास्ताविकात उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी जंगल सफारीची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे तर सहायक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी आभार मानले.

    पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाण

    सातपुडा पाल अभयारण्यात पर्यटकांसाठी अनेक निसर्ग आणि अनुभव समृद्ध ठिकाणे आहेत. त्यात ‘लेक व्ह्यू पॉईंट’ हे विशेष आकर्षण ठरते. डोंगराच्या उंचावरून तलावाचे मोहक दृश्य पाहता येते. निसर्गाच्या सान्निध्यात पक्षी निरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण आहे. ‘इको हट पॉईंट’ हे पर्यावरणपूरक विश्रांती स्थान आहे. बांबू आणि स्थानिक नैसर्गिक साहित्य वापरून बांधलेल्या झोपड्यांमध्ये बसण्याची सोय आहे. हे ठिकाण कुटुंबासह शांत वेळ घालविण्यासाठी योग्य आहे. याशिवाय, ‘सनसेट पॉईंट’ सायंकाळच्या वेळेस अप्रतिम सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. उंचावरून दिसणारा डोंगराळ भाग, घनदाट जंगल आणि मावळणारा सूर्य यांचे दृश्य मनाला मोहविणारे असते. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण अत्यंत योग्य आहे. याशिवाय, वाघडोह हे ठिकाण जंगल सफारीतील सर्वात रोमांचक भाग मानले जाते. येथे वाघ, बिबट्या यांच्यासह विविध वन्यजीवांचा अधिवास आहे. वन्यप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. ही ठिकाणे वनविभागाच्या मार्गदर्शकांसह पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.