सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात १०० भाविकांच्या हस्ते ‘महाआरती’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
श्रावण महिन्यातील दर सोमवारी जागृत स्वयंभू महादेव मंदिरात आरती ठेवण्यात आली होती. जवळपास १०० जोडप्यांच्या हस्ते महाआरती केल्याने पिंप्राळ्यातील सोनी नगरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
श्रावण सोमवारीच २ सप्टेंबर रोजी पोळा आल्याने भाविकांनी महादेवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून श्रावणमासाच्या उपवासाची सांगता केली. ‘बोल बम का नारा बाबा ऐक सहारा है’, ‘हर हर महादेव’, ‘श्री शिवाय नमोस्तुभ्यंम’ च्या जयघोषाने भक्तीमय वातावरणात स्वयंभू महादेव मंदिरात पाचव्या श्रावण सोमवारी सकाळी साडे सात वाजता पाच जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
महादेव मंदिरात नंदीदेवता व महादेवाच्या शिवलिंगाला पहाटे मधुकर ठाकरे, नरेश बागडे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आले. श्रावण महिना हा महादेवाला प्रसन्न करण्याचा पवित्र महिना आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. महादेव मंदिरात कावड यात्रासह विविध धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पाडले. पाचव्या सोमवारी आरतीचे मानकरी- मिलिंद पाटील-दीपाली पाटील, भगतसिंग चावरीया- हेमलता चावरीया, हेमराज गोयर- संगिता गोयर, निलेश शिरसाळकर- सविता शिरसाळकर, संजय सूर्यवंशी-ऊर्मिला सूर्यवंशी यांच्या हस्ते नंदी देवता व जागृत स्वयंभू शिवलिंगाला जलाभिषेकासह दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर शिवलिंगाला बेलपत्राने सजविण्यात आले होते.
यांची लाभली उपस्थिती
यावेळी नरेश बागडे, मधुकर ठाकरे, ममता राणा, संगीता भोई, नंदिता जोशी, सुनिता राजपूत, उषा बोरसे, पूनम पारखे, कल्याणी राजपूत, सरदार राजपूत, नारायण येवले, पंकज राजपूत, उमेश येवले, ओमकार जोशी, निलेश जोशी, गणेश जाधव, संजय भोई, विनोद पाटील यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सोनी नगर, प्रल्हाद नगर, गणपती नगर, ओंकार पार्क, श्रीराम नगर, बाबुराव नगर परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.
महादेवाला नैवेद्य
पाचव्या श्रावण सोमवारी पोळा आल्याने शिवभक्तांनी महादेवाला पुरणपोळी, आमटी, वरण भात, बटाट्याची भाजी, खिर, कढी,वडे, पापड असा नैवेद्याचा मेनू दाखवून उपवासाची सांगता केली.