अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना,बेघर झालेल्या गरिबांना तात्काळ अर्थसहाय्य करावे ! मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे मागणी – अशांतभाई वानखेडे

0
19
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना,बेघर झालेल्या गरिबांना तात्काळ अर्थसहाय्य करावे ! मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे मागणी - अशांतभाई वानखेडे

साईमत मलकापूर प्रतिनिधी 

मिरज तालुक्यातील बेडग गावातील ग्रा.पं.ने बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar)नावाची कमाल प्रवेशद्वार उभारले व नंतर स्वतः बांधलेली कमान बेकायदेशिर ठरवुन तोडुन टाकण्यात आली ही घटना निंदनीय असुन सदर घटनेचा आम्ही निषेध करतो. अश्या पध्दतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणारे लोकांवर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात यावी व सन्मानपूर्वक पूर्ववत उभारण्यात यावी.

अलीकडे दोन दिवसा मध्ये झालेल्या अतिवृष्टीने नागरीकांचे घराचे नुकसान होवुन अनेकांच्या घरांची पडझड,शेतीचे नुकसान व पिकांची हानी झालेली आहे, तसेच व्यापारांच्या दुकानांमध्ये, व्यापारी संकुलना मध्ये बेसमेंट मध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झालेले असून सदर नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून त्यांना अर्थसहाय करावे.

भूमिहीन शेतमजूर तसेच बेघर लोकांनी शासकिय महसुल वनजमिन, गायराण जमिनीवर,पडजमिनीवर शेतीसाठी व निवासासाठी अनेक वर्षापासून अतिक्रमण केलेले लोकांचे अतिक्रमण निरस्त करण्याच्या नोटीसेस महसुल विभागा मार्फत अतिक्रमण धारकांना देण्यात आलेल्या आहेत. सरसकट अतिक्रमण निरस्त केल्यास पात्र अतिक्रमण धारकांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. तसेच भुमिहिन बेघरांना निवासासाठी शासकिय जागेत अतिक्रमण करून घरकुल बांधली आहेत अश्या लोकांना बेघर करण्यात येवु नये यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात न्याय पुनरविलोकन याचीका दाखल करून दारीद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूरांना, बेघरांना न्याय मिळवून देण्याचा तात्काळ प्रयत्न करावा.

अतिक्रमण निरस्त करण्याचे कार्य करतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी विनंती मा .मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावर समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे,मलकापूर व्यापा (CM Eknath Shinde)री संघटनेचे अध्यक्ष श्री अशोकसेठ रजदेव,चेंबर ऑफ कॉमर्स चे सल्लागार सदस्य श्री पारसमल जैन,समतेचे निळे वादळ तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दिलीप इंगळे,संघटक दीपक मेश्राम,कुणाल सावळे,रवी गव्हांदे,रवी भरसाखरे,राजू जाधव,शेख इम्रान,राजेश रायपूर,भीमराव वाकोडे आदींच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here