आदिवासी शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंब राबलं, स्ट्रॉबेरी विक्रीतून झाले मालामाल

0
48

महाराष्ट्रातील शेतकरी आता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करु लागले आहेत. पुण्यापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे गावातील काठेवाडी येथील आदिवासी शेतकरी रमेश बांगर यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा पहिल्यांदा प्रयोग केला आणि यश मिळवलं आहे. रमेश बांगर यांनी त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यापूर्वी ती कधी खाल्ली नव्हती. बांगर यांना पहिल्याचं प्रयोग केला आणि यश मिळवलं आहे. रमेश बांगर यांनी त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यापूर्वी ती कधी खाल्ली नव्हती. बांगर यांना पहिल्याचं प्रयत्नात यश मिळालं असून २ लाख रुपयांचं उत्पन्न मिळाले.
रमेश बांगर हे त्यांच्या शेतात भात लावायचे त्यातून त्यांना दरवर्षी ४ हजार रुपये मिळायचे. रमेश बांगर यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केल्यानंतर चित्र बदललं आहे. त्यांनी १४ गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. यातून मिळालेल्या स्ट्रॉबेरीच्या विक्रीतून त्यांना गेल्या १२ दिवसात ३० हजार रुपये मिळाले आहेत. पुढील चार महिने विक्री सुरु राहिल्यास जवळपास २ लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल, अशी त्यांना आशा आहे.
रमेश बांगर यांच्यासाठी स्ट्रॉबेरीची लागवड जीवन बदलून टाकणारा निर्णय ठरला. त्यांनी सुरुवातीला घरच्या लोकांना स्ट्रॉबेरी मिळावी म्हणून लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या कुटुंबानं गेल्या दोन महिन्यांमध्ये केलेल्या कष्टाचं फळ आता त्यांना मिळालं आहे.
स्ट्रॉबेरी लागवड करण्यापूर्वी ते इतरांच्या शेतात भात कापणीसाठी शेतमजूर म्हणून जात होते. त्यांना प्रतिदिन ३०० रुपये मिळायचे. ते म्हणाले की त्यांचे काका कराडला राहायला आहेत. जुन्नर तालुक्यातील वातावरण महाबळेश्वरसारखं असल्यानं स्ट्रॉबेरी लावता येईल, असं त्यांनी सूचवलं. यानंतर रमेश बांगर यांनी काकांकडून पैसे
घेऊन ४८०० रोपं पाचगणीवरुन विकत घेतली. तिथल्या अनुभवी शेतकऱ्यांशी चर्चा देखील केली.
स्ट्रॉबेरी लागवडीबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी रमेश बांगर यांनी यशस्वी शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहिले, मुलाखती ऐकल्या. त्यातून ज्या गोष्टी समजल्या त्या स्ट्रॉबेरी शेती करताना वापरल्याचं रमेश सांगतात. हा प्रयोग आता
भागातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अनेक शेतकरी रमेश यांच्या शेताला भेट देतात आणि स्ट्रॉबेरी विकत घेऊन जातात. जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील डोंगरी भागातील वातावरण हे स्ट्रॉबेरीसाठी अनुकूल आहे, असे
म्हटले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here