स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुक्ताईनगरात आंदोलन

0
16

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर  प्रतिनिधी 

स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुक्ताईनगर महावितरण विभागाच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णाड १३२ केव्ही येथून दुई,कर्की/कोठा येथे उच्च दाब वाहिनी ३३ केव्ही पुरवठा करण्याकरता सुरू असलेल्या कामांमध्ये विद्युत खांब व विद्युत तारांच्या अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला झोपेचे सोंग घेऊन पाठीशी घालणाऱ्या महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष राहुल काळे सचिन पाटील, श्याम दांडगे प्रफुल पाटील, गणेश दुट्टे ,अभिषेक पाटील , मधूकरभोई,श्रीराम भोई, मंगेश कोळी गजानन पाटील निखिल पाटील दिलीप , पाटील ,दिलीप कांडेलकर,राहुल वाघ , योगेश परीसकर ,मुकेश झाल्टे,प्रेम कोळी,विशाल कांडेलकर,मयूर यमनरे ,पप्पू संदनशीव त्यांची आंदोलनाला उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here