Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon:रुग्णसेवेचे स्वप्न अपूर्णच…! नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू
    क्राईम

    Jalgaon:रुग्णसेवेचे स्वप्न अपूर्णच…! नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू

    saimatBy saimatDecember 29, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: The dream of nursing service remains unfulfilled...! Death of a nursing student
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाडक्या मैत्रिणीचा मृतदेह पाहताच विद्यार्थिनींनी एकच आक्रोश केला

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

    शहरातील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. मयत विद्यार्थिनीचे महिमा चंदन वासनिक (वय-१९, मूळ रा. भंडारा) असे नाव आहे. तिच्या निधनाने शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, महिमा ही देवकर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहून नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करत होती. २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता तिने नेहमीप्रमाणे कपडे धुतले आणि त्यानंतर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. ती आपल्या खोलीत परतली असता, तिला तीव्र चक्कर आली आणि ती कोसळली. हा प्रकार लक्षात येताच तिच्या सोबतच्या मैत्रिणींनी तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला ‘मयत’ घोषित केले.

    महिमाच्या मृतदेहाचे २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात तिच्या सोबत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी आणि मैत्रिणींनी मोठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या मैत्रिणीचा मृतदेह पाहताच विद्यार्थिनींनी एकच आक्रोश केला. ज्यामुळे रुग्णालय परिसर हेलावून गेला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

    महिमाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ हे करत आहेत. रुग्णसेवेचे स्वप्न उराशी बाळगून भंडाऱ्याहून जळगावात आलेल्या एका तरुण विद्यार्थिनीचा असा अंत झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Jalgaon : महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीने कारवाईसाठी निवेदन

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.