साईमत, जळगाव : प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माजी मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त २५ ऑगस्ट रोजी ब्रह्माकुमारी विद्यालयात येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सेवाकेंद्राच्या संचालिका, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणीजीं यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
दादीजींचे संपूर्ण जगावर प्रेम होते आणि त्यांनी जगभरात शांततेचा संदेश दिला. यासाठी त्यांना १९८७ मध्ये वर्ल्ड पीस ॲम्बेसेडर आणि फाइव्ह पीस ॲम्बेसेडर पुरस्कारही मिळाले. त्यांची पुण्यतिथी दरवर्षी जागतिक बंधुता दिन म्हणून साजरी केली जाते. यावेळी प्रा.राजीव शर्मा यांनी सांगितले की, दादीजींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रसन्नता. आयुष्यात कधीच दुःख पाहिले नाही. जेव्हा आपण मनापासून आनंदी असतो, तेव्हाच आपण काही अतुलनीय काम करून जगाला काही देऊ शकतो.
यावेळी ब्रह्माकुमारी वर्षा बेहन म्हणाल्या की, दादीजी हे कुशल ज्वेलर होते. प्रत्येकाला प्रेम आणि आदर देऊन ती प्रत्येकाच्या गुणांची आणि गुणवैशिष्ट्यांची पारख करून त्यांना मोठ्या गोष्टी करायला लावत असे. यावेळी दादींना पुष्पहार अर्पण करण्यात आला.