साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असणाऱ्या हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांचा उर्स शरीफला येत्या शुक्रवारी, २६ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. दर्गा समोरील डोंगरी नदी पात्रात खूप झाडेझूडपे वाढली आहे. नदीत पाणी कमी असले तरी त्यात गटारीचे घाण पाणी साचून झाडी गवतामुळे डासांचा उपद्रव वाढलेला आहे. त्यामुळे दर्गा परिसर विविध समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे. त्यामुळे उर्सपूर्वी नगरपरिषदेने स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
बामोशी बाबा दर्गा मेन पायरीपासून शिरणीचे दुकाने यांना कायमस्वरूपी नदीत असलेला नाला पलीकडे दुकाने लावली गेली पाहिजे. दर्गाला लागून असलेली दुकाने चहा टपऱ्यावर सुरु असलेले अवैध धंदे बंद केले पाहिजे. जेणेकरून याठिकाणी गुन्हेगारी क्षेत्रातील काही मंडळी जी आसरा घेते त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी कायमस्वरूपी बंद केला पाहिजे. शिरणीच्या दुकानात सुरु असलेल्या भाविकांसाठी थांबा व्यवस्था बंद केल्या पाहिजे. चाळीस दिवसाहुन अधिक कोणी भाविक तेथे थांबू नये जे लोकं वर्षानुवर्षे येथे थांबलेले आहे तसेच कायमचे वास्तव्य याठिकाणी केलेले आहे, त्यांना काढले पाहिजे. कारण त्यातले काही जण व्यसनाधीन झालेले आहे. गांजा, भांग, दारू असा नशा करतांना हे अनेक वर्षापासून थांबलेले काही मंडळी करत आहे. त्यांना मुजावर ट्रस्टने काढले पाहिजे. त्यांना मुजावर ट्रस्ट थांबू का देते? असा प्रश्न उपस्थित होते आहे. याठिकाणी येणारे भाविक पुरुष, महिलांसाठी शौचालय स्नानासाठी व्यवस्था झाली पाहिजे. दर्गा विकासाच्या कामासाठी आ.मंगेशदादा चव्हाण नेहमी मदतसाठी तयार असतात. त्यांना ट्रस्टने व्यवस्थित पाठपुरावा केला तर विकास कामे नक्कीच होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
