विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ तर शिक्षिकांचा खुला गट तृतीय
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनीच्यावतीने आयोजित २४ वा जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव रविवारी शहरातील गंधे सभागृहात जल्लोषात पार पडला. महोत्सवात विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयाने लक्षणीय यश मिळवले. विद्यार्थिनींनी केलेल्या सादरीकरणाला मोठ्या गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तर विद्यालयातील शिक्षिकांच्या कलाकृतीला खुल्या गटातून तृतीय पारितोषिक मिळाले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या शिक्षिकांमध्ये रुपाली पाटील, स्मिता चव्हाण, कविता कुरकुरे, तेजस्वी बाविस्कर, स्नेहा झाडे, राजश्री वराडे, मानसी पाटील, अंकिता कुरकुरे, स्वाती पाटील, नयना चिंचोले यांचा समावेश आहे. त्यांना विद्यालयाचे शिक्षक भूषण गुरव, वरुण नेवे, उमेश सूर्यवंशी, दर्शन गुजराथी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी कामगिरीबद्दल शालेय व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख रुपाली पाटील, स्वप्निल पाटील, विद्यासमिती प्रमुख जगदीश चौधरी यांच्यासह सर्व शिक्षकांसह शालेय परिवाराने अभिनंदन केले आहे.
