The Cruel Father : क्रुर बापाने केली मुलीला मारहाण, पत्नीला केले जखमी

0
20

चंदू अण्णा नगरातील घटना, तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

शहरातील चंदू अण्णा नगरात मद्यपान केलेल्या बापाने मोबाईलवरील गाणे बंद केल्याच्या रागातून आपल्या अकरावीत शिकणाऱ्या मुलीला कुकरच्या झाकणाने मारहाण केली तर पत्नीला काचेचा ग्लास फोडून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी समाधान विजयसिंग पाटील (वय ३२, रा. चंदू अण्णा नगर) याच्याविरुद्ध १६ ऑगस्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, शहरातील चंदू अण्णा नगरात समाधान पाटील हा मद्यपान करून घरी आला. त्याने पत्नीच्या मोबाईलवर गाणे लावले. त्यावेळी त्याची मुलगी प्राप्ती पाटील, जी अभ्यासात व्यस्त होती. तिने वडिलांना गाणे बंद करण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी ऐकले नाही. म्हणून प्राप्तीने स्वतःच मोबाईलवरील गाणे बंद केले. अशा क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या समाधानने काचेचा ग्लास फोडून पत्नी जागृती पाटील हिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

बापाने मूळगावी केले पलायन

आईला मारहाण होताना पाहून मुलगी प्राप्ती तिला सोडविण्यासाठी पुढे सरसावली. तेव्हा क्रूर बापाने कुकरच्या झाकणाने तिच्या हातावर मारून तिला जखमी केले. पत्नी आणि मुलीला मारहाण केल्यानंतर समाधान पाटील हा आपल्या मूळ गावी कल्याणेहोळ येथे पळून गेला. तिथे त्याने आपल्या आई-वडिलांकडे “या दोघींचा खून करणार” असे सांगितले असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पत्नीच्या दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here