From Love On ‘Facebook’ : ‘फेसबुक’वरील प्रेमातून जळगावातील पोलिसाचे गुन्हेगारी खोटेपण उघड

0
15

फसवणुकीसह शारीरिक शोषण ; शहर पोलिसात पो.कॉ.सह परिवाराविरोधात गुन्हा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

‘फेसबुक’च्या माध्यमातून ओळख झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन कोलकाता येथील महिलेवर अनेक वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या परिवारातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, जळगाव पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल नितीन सपकाळे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१७ पासून त्याच्याशी तिचा संपर्क होता. अविवाहित असल्याचे सांगत त्याने मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवले. अशा आश्वासनावर विश्वास ठेवून महिला वेळोवेळी जळगावला येत राहिली. त्याच काळात आरोपीने तिला हॉटेलमध्ये नेऊन वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. २०२० मध्ये महिलेला नितीन विवाहित असून त्याला एक मुलगी असल्याचे समजले. तरीही त्याने पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगत फसवणूक सुरू ठेवली होती.

लग्नाचे खोटे आश्वासन, मंदिरात जबरदस्तीचे लग्न

२०२१ ते २०२५ या काळात अत्याचार सुरूच राहिला. अखेरीस २०२५ मध्ये त्याने विवाहास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या परिवाराने महिलेवर दबाव आणत एका मंदिरात जबरदस्तीने लग्न लावून दिले. मात्र, नंतर हे लग्न अवैध असल्याचे सांगून तिला सोडून दिले. याप्रकरणी पीडितेने २३ सप्टेंबर रोजी जळगाव शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नितीन सपकाळे, त्याची पत्नी आणि आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here