यावलला राजे निंबाळकर यांच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा

0
139

साईमत, यावल : प्रतिनिधी

येथील राजे निंबाळकर यांच्या किल्ल्यावर ६ जून रोजी ‘एक दिवस महाराजांसाठी’ प्रतिष्ठानतर्फे तसेच यावल शहरातील सकल हिंदू बांधवांतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रम व भव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शहरातील श्‍याम शास्त्री महाराज यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे राज्याभिषेक पूजन शास्त्रोक्त पद्धतीने करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. पुजनासाठी अथर्व बयानी महाराज यांनी सहकार्य केले. त्यानंतर किल्ल्याच्या पायथ्यापासून यावल शहरातून मेन रस्त्यावरून शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रामध्ये चुंचाळे येथील गुरुमाऊली भजनी व म्युझिकल बँड सोबत वडोदा येथील महिलांचे व पुरुषांचे भजनी मंडळ त्यानंतर शिवरायांची पालखी, शिवरायांचा सजीव देखावा, बुरझड, जि.धुळे येथील सरस्वती बँड, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा हे शोभायात्रेमधील विशेष आकर्षण ठरले.

पुणे येथील प्रवीण चौधरी यांनी शिवरायांची भूमिका साकारली. कार्यक्रमाची सांगता बोरावल गेट येथील शिवतीर्थ स्थळाजवळ झाली. शिवतीर्थ येथे सर्वात आधी ‘शिवरायांचा प्रताप’ हे नाटक सादर करण्यात आले. नाटकासाठी धनराज कोळी, खेमराज करांडे, कुणाल चित्ते, ललित बारी, स्वामी चौधरी यांनी सादरीकरण केले.त्यानंतर शिवतीर्थावर शिव वंदना व ध्येयमंत्र घेऊन डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते शिव आरती केली. पुणे येथील शिवभक्त समाधान लाड यांनी शिवगारद घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

यशस्वीतेसाठी ‘एक दिवस महाराजांसाठी’ प्रतिष्ठान समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.अभय रावते, उपाध्यक्ष योगेश वारूळकर, धीरज भोळे, प्राचीताई पाठक, धनंजय बारी, सागर चौधरी, मनसे शहराध्यक्ष अजय तायडे, पंकज जोहरी, दीपक वारूळकर, निलेश बारी, सोहम बारी, गोपी बारी, संदीप रेघे, गोलू बारी, सागर लोहार, चेतन बारी, गौरव बारी, ज्ञानेश्‍वर जाधव, मयूर बारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त चोख ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here