साईमत, बोदवड : प्रतिनिधी
शहरातील कत्तलखाना आणि गोहत्या बंद व्हावी, अशा मागणीसाठी बोदवड येथे गेेल्या नऊ दिवसांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष संजय शर्मा (धुळे) हे तहसील कार्यालयाच्या परिसरात उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे तहसिलदारांनी प्रशासनाला आदेश दिले आहे. परंतु उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत संबंधितांवर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचे सांगितले. तीन दिवसांपूर्वी गोसेवकांचा गोहत्या बंदीसाठी मुख्याधिकारी कार्यालावर मोर्चा नेण्यात आला होता.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्याशी संपर्क साधल्यावर ज्या ओट्यावर मास विक्री होते. ते ओटे पाडण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले. कार्यवाही करण्यास सुरु केली असून संबंधितांवर कार्यवाही होणार असल्याचे सांगितले. संजय शर्मा यांच्या उपोषणाला शेकडो संस्थानच्या हजारो नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील गोसेवक त्यांना भेटी देण्यात येत आहे.