गणेशपूर, वलठाण शिवारात वाढला होता वावर
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील गणेशपूर आणि वलठाण शिवारात गणेशपूर येथील जाधव यांच्या शेतात नरभक्षक बिबट्याला जेरबंद केल्याचे वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात वन अधिकारी शितल नगराळे यांच्यासह पथकाची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु असल्याचेही सांगण्यात आले.
बिबट्याचा गणेशपूर आणि वलठाण शिवारात वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. नरभक्षक बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अशातच वनविभागाच्या पथकाला यश मिळून बिबट्याला अखेर जेरबंद केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.