‘G. H. Raisoni Karandak’ : ‘जी. एच. रायसोनी करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा बिगुल वाजला, नोंदणीसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत

0
14

जळगावात रंगणार प्राथमिक फेरी ; विजेत्यांसाठी १ लाख ११ हजारांचे पहिले पारितोषिक

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

राज्यातील रंगभूमीवरील तरुणाईच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे “जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव येथे तर अंतिम फेरी नागपूर येथे पार पडणार आहे. स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे प्राथमिक फेरीचे आयोजन केले आहे. त्यात अव्वल ठरणाऱ्या तीन एकांकिकांना अंतिम फेरीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. अंतिम फेरी १ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नागपूर येथे रंगणार आहे.

विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद केली आहे. प्रथम क्रमांक १ लाख ११ हजार रुपये, द्वितीय ७१ हजार रुपये, तृतीय ५१ हजार रुपये तर प्रथम व द्वितीय उत्तेजनार्थ संघांना प्रत्येकी २१ हजाराची पारितोषिके जाहीर केली आहेत. याशिवाय व्यक्तिगत व विशेष पुरस्कारही दिले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांना एक हजार १०० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख येत्या ७ नोव्हेंबर २०२५ निश्चित केली आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज व नियमावली https://ghraisonikarandak.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, मुख्य समन्वयिका मृणाल नाईक आणि जी. एच. रायसोनी करंडक टीम यांच्यावतीने केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी जळगाव आयोजन समिती प्रमुख बापूसाहेब पाटील यांच्याशी ९१७५७५८६३० किंवा ८००७६८४९६० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here