वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसिलदारांसह मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
शहरातील तितूर नदीवरील पंचम कार्यालय ते दयानंद हॉटेलपर्यंत असलेल्या पुलास विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे चाळीसगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संदेश निकुंभ व नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही चाळीसगाव शहराचे रहिवासी आहोत. आम्ही आपणास विनम्र विनंती करतो की, नुकतेच बांधलेल्या पंचम कार्यालय ते दयानंद हॉटेलपर्यंत असलेल्या नदी पात्रावरील पुलास विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. चाळीसगाव शहरात यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक अशी नामकरणे केली आहेत. तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदानही विसरता येणार नाही. त्यामुळे पूलास त्यांचे नाव देऊन आपण त्यांच्या कार्याला आदरांजली वाहू शकतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळू शकते.
आम्ही विनंती करतो की, आपण या प्रस्तावाचे अवलोकन करून अनुकूल निर्णय घेऊन तमाम डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जणांच्या भावनांचा आदर राखावा. प्रस्तावास मान्यता यावी. ज्यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.बहुजन वंचित आघाडीचे जळगाव जिल्हा निरीक्षक युवराज जाधव (संभा आप्पा) यांनी सांगितले की, जर ही मागणी मान्य केली नाही तर संविधानिक मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
यांची लाभली उपस्थिती
यावेळी देविदास जाधव, अरुण जाधव, शरद जाधव, निलेश राजपूत, गणेश देवरे, समाधान जाधव, सोनू जाधव, बंडू जाधव, लल्ला जाधव, श्याम जाधव, सागर अहिरे, सोनू बोराळे, आकाश जाधव, दीपक जाधव, रुपेश जाधव, कैलास निकम, प्रशांत जाधव, लोट्या जाधव, मनोज जाधव, राहुल मोरे, पवन जाधव, गोलू जाधव, बंटी जाधव, वैभव जाधव, निलेश जाधव, ऋषी गायकवाड, राहुल चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.