जी.एम.फाउंडेशनमधील बैठकीत आ.सुरेश भोळे यांची माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भाजपाच्या नूतन कार्यालयात अर्थात जीएम फाउंडेशन येथे शुक्रवारी, १२ सप्टेंबर रोजी दुपारी जळगाव जिल्हा महानगराची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. सेवा पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या समिती याठिकाणी जाहीर करण्यात आली. बैठकीला आ. सुरेश भोळे (राजूमामा), महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सेवा पंधरवडा संयोजक विजय वानखेडे, उदय भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
सेवा पंधरवड्यात आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान, प्रतिभावानांचा सन्मान, ‘वोकल फॉर लोकल’ चा प्रचार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनकार्यावर आधारित फिल्म आणि पुस्तक वितरण, खासदार क्रीडा चषक स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे. हे कार्यक्रम समाजात जागरूकता निर्माण करणारे आणि राष्ट्रीय मूल्यांची जपणूक करणारे असतील, असे राजूमामा भोळे यांनी बैठकीत सांगितले. याप्रसंगी भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांची शिंपी समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, जयेश भावसार, भारतीताई सोनवणे, प्रदेश सदस्य संतोष इंगळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे तर आभार जयेश भावसार यांनी मानले.
समितीतील जिल्हा संयोजकांसह संयोजक असे
सेवा पंधरवाडा कार्यक्रमाच्या समितीत जिल्हा संयोजक विजय वानखेडे, जिल्हा सहसंयोजक ज्योती निंभोरे, सागर पाटील जिल्हा सोशल मीडिया अक्षय चौधरी यांचा समावेश आहे. भाजपातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी नियुक्त केलेल्या संयोजकांमध्ये राजेंद्र मराठे, भारती सोनवणे, महेश पाटील, डॉ.मनोज टोके, पवन खंबायत, भूषण लाडवंजारी, सहसंयोजक सुनील वाणी, डॉ.चंद्रशेखर पाटील, संतोष इंगळे, राजेंद्र घुगे-पाटील, अरुण श्रीखंडे, सहसंयोजक निलेश बाविस्कर, शिरीष तायडे, महेश पाटील (युवा मोर्चा), प्रकाश बालाणी, ॲड.शुचिता हाडा, प्रदीप रोटे आदींचा समावेश आहे.