आयोजकांतर्फे सुवर्णकार समाज बांधवांना उपस्थितीचे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरूणमधील संत शिरोमणी नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७८२ व्या जयंती महोत्सवानिमित्त सायंकाळी ७ वाजता प्रतिमा पूजन, आरती सोहळा आणि सुनील जाखेटे (सी.ए.) इस्कॉन परिवाराच्या टीमच्यावतीने कीर्तन संध्या अश्या स्वरूपात जयंती महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.
यंदा महोत्सवाचे विशेष औचित्य साधून हा सोहळा संस्थेचे माजी सचिव ॲड.केतन भिकन सोनार यांच्या प्लॉट नं.२० अ, सर्व्हे नं. २५१ , स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, मेहरूण येथील राहत्या घरी साजरा होणार आहे. जयंती सोहळ्यासाठी सर्व सुवर्णकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रमेश वाघ यांनी केले आहे.
