मेट्रोच्या खांबाला धडकून बाईकने घेतला पेट

0
15

ठाणे ः प्रतिनिधी

ठाण्यात एक भयंकर अपघात झाला आहे. घोडबंदर रोड येथे मेट्रोच्या खांबाला धडकून एका ३० वर्षीय तरुणाचा भीषण अपघात झाला आहे. इतके च नव्हे तर अपघातानंतर त्याच्या बाईकने पेट घेतला. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

गेल्याकाही दिवसांपासून रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अनेकदा खड्डयांमुळे तर कधी कधी निष्काळजीपणांमुळेही अपघात होत असतात. ठाण्यातील या घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर परिसरात हा अपघात घडला आहे. अपघातानंतर दुचाकीही जळून खाक झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी पहाटे ५.३०च्या सुमारास हा अपघात घडला आहे. यावेळी दुचाकीस्वार हा मिरा रोड येथील रहिवाशी आहे. दुचाकीस्वार घोडबंदर रोडहून ठाण्याच्या दिशेने जात असताना मेट्रोचे काम सुरू असलेल्या खांबाला त्याची दुचाकी आदळली. हा अपघाच इतका भीषण होता की दुचाकी खांबाला धडकल्यानंतर लगेचच पेट घेतला. तर, दुचाकीस्वारालाही गंभीर मार लागला होता. त्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here