२ हजार भाविकांना आ.सुरेश भोळे घडवताहेत ‘अयोध्या काशी दर्शन’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील भाविकांसाठी मोफत रेल्वेने अयोध्या-काशी यात्रा प्रवासाचे जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे यांच्या पुढाकाराने आयोजन केले आहे. विशेष यात्रेची सुरुवात रेल्वे स्थानकावरून ‘जय श्रीराम’ ‘हर हर महादेवाचा’ जयघोष करत रविवारी, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता २ हजार भाविक अयोध्या जाण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी मंत्री ना.गिरीष महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे, खा.स्मिताताई वाघ, आ.सुरेश भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण अध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी आदींनी रेल्वेला झेंडा दाखवून भाविकांना रवाना केले.
ही धार्मिक यात्रा भाविकांसाठी एक अध्यात्मिक अनुभव ठरणार आहे. सर्वांच्या सहकार्याने ती यशस्वी होईल, असा विश्वास आ.सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे स्वतः आ.सुरेश भोळे, माजी महापौर सीमाताई भोळे हे स्वतः कार्यकर्त्यांसह भाविकांबरोबर रेल्वे गाडीत उपस्थित आहेत. त्यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.