साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील रेल्वे कॉलनीतील सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे २७ नोव्हेंबरपासून श्रीराम चरित मानस कथेला सुरुवात झाली आहे. श्रीराम कथेचे गुरुजी श्रीधर मिश्रा यांनी कथेत श्रीराम व हनुमानाच्या लहानपणाची गोष्ट सांगत असताना तेथे मारुतीने वानरराजच्या रुपात कथेच्या ठिकाणी भेट देऊन मारुती मंदिरात जाऊन तेथे प्रसादासाठी ठेवलेला लाडू खाल्याने उपस्थित भाविकांनी दर्शन घेऊन जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला.
कथेच्या सुरुवातीला भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उत्तरप्रदेश मुर्झापूर येथील श्रीराम कथेचे वक्ते श्रीधर ब्रीजमोहन मिश्रा यांनी तुलसीदासजींचा वर्णन करत कथेला प्रारंभ केले. कथेत गुरुजी हे श्रीराम व हनुमानाच्या लहानपणाची गोष्ट सांगत असतांना कथेच्या जवळ असलेल्या वृक्षाच्या फांदीवर बसून मारुतीने वानरराजच्या रुपात कथेच्या ठिकाणी भेट देवून मंदिरातील मारुती मंदिरात जाऊन तेथे प्रसादासाठी ठेवलेला लाडू घेऊन खायला सुरुवात करताच भाविकांनी जय श्रीरामाच्या जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्रीराम चरित मानस कथा श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर रेल्वे कॉलनीत ३ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. भाविकांनी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजता कथेचा तर ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २.३० वाजता महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुपेश झवर यांनी केले आहे.