खडसे परिवाराने एकत्र येऊन केली ‘बाप्पा’ची आरती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी ‘श्रींच्या’ स्थापनेच्या दिवशी बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी ‘गणपती बाप्पा’चे आगमन झाले. यावेळी पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने बाप्पाची प्रतिष्ठापना केली. यावेळी खडसे परिवाराने एकत्र येऊन ‘बाप्पा’ची आरती केली. याप्रसंगी रक्षा खडसे यांचे सासरे तथा माजी मंत्री आ. एकनाथ खडसे, सासू मंदाकिनी खडसे यांच्यासह मुले तसेच परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहात ‘बाप्पा’चे स्वागत केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही खडसे परिवारात गणेशोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले आहे. आरतीवेळी “गणपती बाप्पा मोरया” गजरात परिसर दणाणला होता. सोहळ्यात भक्तिभाव आणि आनंद यांचा संगम झाल्यामुळे धार्मिक वातावरण अधिकच फुलले होते.