नूतन कार्यकारिणीची घोषणा लवकरच, महिला सबलीकरणासाठी ‘आम्ही सिद्ध लेखिका’ कार्यक्रम”
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रा.शांताराम पाटील होते. सभेचे उद्घाटन संस्थापक-अध्यक्ष अमृतयात्री डी.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सभेला उपाध्यक्ष विनोद जाधव, माजी खजिनदार सुखदेव महाजन, व्ही.डी. पाटील यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.
सभेत सचिव जितेंद्र गोरे, गोरख सूर्यवंशी यांनी संस्थेच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. मागील सभेचे इतिवृत्त, आर्थिक वर्ष २०२४-२५ चे जमा खर्च आणि २०२५-२६ चे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. तसेच २०२५ ते २०३० अशा पाच वर्षांसाठी २१ जणांची कार्यकारिणी नियुक्त केली. तसेच ज्येष्ठ साहित्यिक विजय सैतवाल, श्री.चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
संमेलनासाठी १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत साहित्य पाठविण्याचे आवाहन
अमृतयात्री डी.डी. पाटील यांनी महिला सबलीकरणासाठी “आम्ही सिद्ध लेखिका” कार्यक्रमाची माहिती दिली. जामनेर तालुका नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर होईल, असे सांगितले. आगामी साहित्य संमेलनासाठी येत्या १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कविता, साहित्य व बायोडाटा दोन प्रती पाठवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.