कामगार मंडळाचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ठरताहेत प्रेरणादायी

0
13

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

स्पर्धात्मक युगाचा विचार केल्यावर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी गाव तेथे वाचनालयाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाचन संस्कृती रुजविणे काळाची गरज आहे. त्यासाठी कामगार मंडळाचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष विचारांना कृतीची जोड देण्यासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन ॲड.राहुल वाकलकर यांनी केले.

महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ‘स्पर्धा परीक्षा काळाजी गरज’ विषयावर व्याख्यान तथा ‘स्वामी विवेकानंद आणि आजची तरुणाई’ विषयावर आधारित निबंध स्पर्धा आयोजित केली होती. याप्रसंगी निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख श्री.वाघारे, बी.टी.पाटील, राजू कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा.सचिनकुमार दायमा यांनी केले. त्यात त्यांनी कामगार कल्याण मंडळाचे महत्त्व व कामगार पाल्यांसाठी शासकीय शिष्यवृत्ती योजना मंडळाकडून राबविल्या जातात, असे सांगितले. तसेच तालुक्यातील सर्वाधिक कामगारांच्या पाल्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान मंडळाच्यावतीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here