संमेलनात विविध सत्रांचा असणार समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पवन चॅरिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्ट, कविवर्य स्व.पुरुषोत्तम नारखेडे बहुउद्देशीय संस्था, युवा विकास फाउंडेशन यांच्या सौजन्याने कविवर्य स्व.पुरुषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अठरावे बहिणाबाई सोपानदेव खान्देश खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी, १३ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जळगावातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन हॉलमध्ये होत आहे. संमेलनाचे उद्घाटन आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी डॉ.फुला बागुल राहतील.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.स्मिताताई वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक अमित काळे, माजी संमेलनाध्यक्ष संजीवकुमार सोनवणे असतील. स्वागताध्यक्ष म्हणून पुष्पाताई साळवे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे आहेत. यासोबतच सेवानिवृत्त डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड, लेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रवीण भोळे, बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहतील. याप्रसंगी बहिणाबाई सोपानदेव चौधरी मालतीकांत जीवनगौरव पुरस्कार २०२५ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांना प्रदान करण्यात येईल. संमेलनात पोस्टर पोएट्री, खान्देशातील कवी-कवयित्रींच्या स्वलिखित कवितांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार राजू बाविस्कर करतील.
दुसऱ्या सत्रात परिसंवाद आणि ‘ती लिहीती झाली’च्या अध्यक्षस्थानी ॲड. विलास मोरे आहेत. त्यात प्रा. संध्या महाजन, मंजुषा पाठक सहभागी होणार आहेत. चौथ्या सत्रात कथाकथन कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगकर्मी प्रा. दिलीप जाने आहेत. यावेळी प्रा. गोपीचंद धनगर, संस्कृती पवनीकर कथा सत्र सादर करतील. पाचव्या सत्रात बालकांचे भावविश्व आणि साहित्य सहवासाच्या अध्यक्षस्थानी माया धुप्पड असतील. त्यात जयश्री काळवीट, सुशीलकुमार शिंदे, रवींद्र सोनवणे सहभागी होतील. कवी संमेलनाच्या सहाव्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.बी.एन. चौधरी असतील. यावेळी खान्देशातील मान्यवर कवी आपल्या कविता सादर करतील.
आयोजकांतर्फे संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन
समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी पौर्णिमा हुंडीवाले राहतील. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरणासह कवींना सहभागाचे सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. खान्देशातील साहित्यिकांनी साहित्य संमेलनाला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक डॉ. विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे, आयोजक रघुनाथ राणे, डॉ. संजय पाटील, प्रा. संध्या महाजन, ज्योती राणे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.