‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी

0
14

साईमत भडगाव प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून मराठा महासंघाच्यावतीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना शुक्रवारी, ४ ऑगस्ट २०२३ रोजी निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या.

मनाला वेदना देणारा हा गुन्हा आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्मातून संताप व्यक्त केला जात आहे. म्हणून हा गुन्हा एलसीबीकडे वर्ग करण्यात यावा, पोलिसांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात लवकरात लवकर चार्जशीट सादर करावे, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, खटला चालविण्यासाठी सरकारी वकील उज्जवल निकम (Adv Ujjawal Nikam) यांची नियुक्ती होण्यासाठी पोलीस प्रशासनाने आपल्या स्तरावर योग्य ते प्रयत्न करावेत, पीडित कुटुंबाला व खटल्यातील साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहे.

निवेदनावर चाळीसगावचे शहराध्यक्ष खुशाल बिडे, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, शहर सचिव नंदकिशोर जाधव, ॲड. नीलकंठ पाटील, अनिल कोल्हे, अशोक भोसले, सुनील गायकवाड, भास्कर शेटे, बापू बिडे यांच्यासह मराठा बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here