Rhythmic Gymnastics : ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकस राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे, मुंबई शहर, पुणे अव्वल

0
16

विविध वयोगटात वर्चस्व राखत खेळाडूंची पदकांची कमाई

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

३५ व्या ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा निकाल रविवारी, ३० नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यात ठाणे, मुंबई शहर व पुण्याचे संघ अव्वल ठरले आहेत. महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना व जळगाव हौशी जिम्नॅस्टिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ३५ व्या ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. स्पर्धेत ठाणे, मुंबई शहर व पुण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत विविध वयोगटात पदकांची कमाई केली. तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते अक्षता शेटे, मानसी सुर्वे यांनी तांत्रिक समिती प्रमुख काम पाहिले. स्पर्धा राज्य संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या वर्षा उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

पारितोषिक वितरण समारंभाला उद्योगपती रजनीकांत कोठारी, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनचे अध्यक्ष ॲड.किशोर पाटील, बाळासाहेब सुर्यवंशी, ॲड. कुश मलारा, विकास वाघ, राम पवार, विद्या प्रबोधिनीचे योगेश पाटील, भूपेश व्यास, दीपक परदेशी, प्रा.वासुदेव पाटील, ॲड. स्वाती निकम, अर्चना सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी प्रा. शिवराज पाटील, महेंद्र साळुंखे, महेश पाटील, डॉ.अनिता पाटील, चेतन बोरसे, शिवम पाटील, अजय पाटील, पकंज सूर्यवंशी, कल्पना देवरे, निलिमा बोरसे, नंदिनी दुसाने, मानराज चौधरी आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन अक्षय सोनवणे तर आभार प्रवीण पाटील यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल असा

सब ज्युनिअर गटातील ऑल राऊंडमध्ये प्रथम मीरा मेनन, ठाणे, द्वितीय आरोही टकले, पुणे, तृतीय अवनी कदम, ठाणे, सिनीयर गटात प्रथम किमया कार्ले, ठाणे, द्वितीय शुभश्री मोरे, मुंबई शहर, तृतीय परीना मदनपोत्रा, मुंबई शहर, सांघिक विजेते संघात सब ज्युनिअर गटात प्रथम ठाणे, द्वितीय पुणे, तृतीय मुंबई शहर, ज्युनिअर गटात प्रथम पुणे, द्वितीय ठाणे, तृतीय पालघर, सिनियर गटात प्रथम मुंबई शहर, द्वितीय ठाणे, तृतीय पुणे यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here